कृपाशंकर सिंग यांना हायकोर्टाचा धक्का

October 7, 2010 11:57 AM0 commentsViews: 6

6 ऑक्टोबर

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांना हायकोर्टाने धक्का दिला आहे.

कृपाशंकर सिंग यांच्या बेहिशोबी संपत्ती संदर्भात तपास करणार्‍या यंत्रणांनी माहिती देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. कृपाशंकर सिंग यांच्या बेहिशोबी संपत्ती संदर्भात याचिकेवरील सुनावणीच्या वेळी हायकोर्टाने ही माहिती मागवली आहे.

हायकोर्टाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आणि इन्फॉरेसमेंट डायरेक्टोरेटला माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. 27 ऑक्टोबरपर्यंत ही माहिती द्यावी लागणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी कृपाशंकर सिंग यांचे मधु कोडा यांच्यासोबत संबध असल्याचा आरोप याचिकेतून केला आहे. मधु कोडा यांच्यासोबत हात मिळवून कृपाशंकर यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचाही आरोप तिवारी यांनी केला आहे.

याचिकाकर्त्यांचे वकील महेश जेठमलानी यांनी यासंदर्भात एसआयटीची स्थापना करण्याची मागणी केली आहे.

close