बसमधून दीड कोटी नेणार्‍या प्रवाशास अटक

October 7, 2010 10:36 AM0 commentsViews: 1

7 ऑक्टोबर

कोल्हापूर – मुंबई लक्झरी बसमधून दीड कोटींची रक्कम घेऊन जाणार्‍या एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. ही बस इचलकरंजीहून मुंबईकडे जात होती.

संजय ट्रॅव्हल्स या कंपनीच्या आरामबसमधून ही एकूण एक कोटी 52 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

पुणे पोलिसांनी खेड शिवापूर टोलनाक्याजवळ ही कारवाई केली.

यात 6 लाख रुपये किंमतीचे 353 ग्रॅम सोनेही जप्त करण्यात आले आहे.

चौकशीसाठी बस पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे.

close