वर्धावासियांची दिवाळी लोकसेवा मंचामुळे शक्य

October 28, 2008 1:13 PM0 commentsViews: 5

28 ऑक्टोबर, वर्धा – दिवाळी म्हटलं की दिव्यांचा लखलखाट, फराळाची रेलचेल असंच काहीसं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं. पण झोपडपट्टीतल्या माणसांना जिथं दोन वेळचं खायला मिळत नाही, तिथं दिवाळी कशी साजरी करणार ? पण अशा लोकांसाठी वर्ध्यात लोकसेवा मंचानं रवा, साखर आणि गव्हाचं वाटप केलं. या उपक्रमानं अनेकांना घरी फराळ तयार करण्याची सोय झाली आहे. लोकसेवा मंचचे अध्यक्ष श्याम गायकवाड यांच्यामुळे हा कार्यक्रम झाला.

close