जम्मू आणि काश्मीर विधानसभेत गोंधळ

October 7, 2010 10:48 AM0 commentsViews: 62

7 ऑक्टोबर

जम्मू आणि काश्मीर विधानसभेत आज चांगलाच गोंधळ उडाला.

मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी काश्मीर हे भारतात विलीन झाले नसून एका कराराद्वारे भारतात आले आहे, असे विधान केले होते.

पँथर पक्षाचे आमदार आणि भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्र्याच्या या विधानाचा निषेध व्यक्त करत गोंधळ घातला.

या आमदारांना बाहेर काढण्यासाठी मार्शल बोलावण्यात आले. या दरम्यान झटापट होवून एका आमदाराचा पाय फ्रॅक्चर झाला.

तर एका आमदाराचे डोके फुटले.

close