नवरात्र उत्सवाची तयारी जोरात

October 7, 2010 11:20 AM0 commentsViews: 23

पल्लवी वाणी, मुंबई

7 ऑक्टोबर

उद्यापासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे… त्यामुळे दांडीयाची तयारी जोरदार सुरू आहे.

बोरिवलीचा नायडू क्लबही दांडिया रिहर्सलमध्ये बिझी आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही नायडू क्लबने नवरात्र उत्सव आयोजित केला आहे. त्यांची तयारी जोरात सुरू आहे.

यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे यावेळी इंडियन आयडॉल 5 चे फायनलिस्ट स्वरूप, शिवम, राकेश आणि विजेता श्र्रीराम यांची दांडियाला खास उपस्थिती.

हे चारही जण नवरात्रीच्या 9 ही दिवस खास नायडू क्लबसाठी गाणार आहेत.

यामुळे नायडू क्लबची ही नवरात्र रंगतदार होणार, असे दिसत आहे.

close