शूटिंगमध्ये आणखी एक गोल्ड

October 7, 2010 11:26 AM0 commentsViews: 4

7 ऑक्टोबर

शूटिंगमध्ये भारतीय टीमला आज आणखी एक गोल्ड मेडल मिळाले.

25 मीटर रॅपिड फायर पिस्टल पेअर इव्हेंटमध्ये गुरप्रीत सिंग आणि विजय कुमार यांनी गोल्ड पटकावले.

क्वालिफायिंग राऊंडमध्ये भारतीय जोडी 673 पॉईंटसह दुसर्‍या स्थानावर होती.

पण त्यानंतर फायनलमध्ये आपली कामगिरी उंचावत त्यांनी गोल्ड जिंकले.

भारताचे हे 12 वे गोल्ड तर शूटिंगमधील सहावे गोल्ड ठरले आहे.

तिरंदाजीत पहिले गोल्ड

तिरंदाजीतही भारतीय टीमने पहिल्या मेडलची नोंद केली आहे. महिलांच्या टीमने कम्पाऊंड टीम प्रकारात ब्राँझ मेडल पटकावले.

सेमी फायनलमध्ये टीमला कॅनडाकडून पराभव पत्करावा लागला होता.

पण त्यानंतर ब्राँझ मेडलच्या मॅचमध्ये गुरुदीप कौर, भाग्यवती चानू आणि जे हंसदा यांनी मलेशियन टीमला चांगली लढत दिली.

ही मॅच त्यांनी 223 विरुद्ध 219 पॉइंट्सनी जिंकत ब्राँझ मेडल पटकावले.

कुस्तीत महिलांची कामगिरी

कुस्तीत महिलांची कामगिरीही तुफान होत आहे. निर्मला देवीने 48 किलो वजनी गटात फायनल गाठली आहे.

त्यामुळे भारताचे आणखी एक मेडल पक्के झाले आहे. निर्मला देवीने सेमी फायनलमध्ये नायजेरियाच्या लिवोनोचा 5-1 ने पराभव केला.

या मॅचमध्ये निर्मलाची सुरुवात धिमी झाली. पण तिसर्‍या डावात महत्त्वाचे तीन पॉईंट मिळवून तिने लिनोवोला मागे टाकले.

55 किलो गटात मात्र सुमन कुंडूचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला. त्यामुळे तिला आता ब्राँझ मेडलसाठी प्रयत्न करावे लागतील.

स्विमिंगमध्येही पहिले गोल्ड

कॉमनवेल्थमध्ये भारतीय फॅन्सचे लक्ष शूटिंग आणि कुस्तीतील मेडलकडे लागले असताना स्विमिंगमध्येही भारताने पहिले वहिले मेडल जिंकले आहे.

पॅरा स्विमिंगमध्ये प्रशांत कर्माकरने ब्राँझ पटकावले आहे. कॉमनवेल्थसारख्या स्पर्धेत स्विमिंगमध्ये भारताला मिळालेले हे पहिले मेडल आहे.

50 मीटर फ्रिस्टाईल स्पर्धेत 27.48 शतांशांची वेळ देत प्रशांतने ब्राँझ पटकावले. प्रशांतला उजव्या पायाला अपंगत्व आहे.

ऑस्टे्रलिया पहिल्या स्थानावर

कॉमनवेल्थ गेम्सच्या चौथ्या दिवशी 21 गोल्ड मेडल पटकावत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे.

तर भारताने आपला दुसरा क्रमांक कायम ठेवला आहे.

भारताच्या खात्यात एकूण 26 मेडल्स जमा झाली आहेत. यात 12 गोल्ड मेडल्स आहेत.

तर 8 सिल्व्हर आणि 6 ब्राँझ मेडलचा समावेश आहे.

close