कुत्यूर फॅशनवीक सुरू

October 7, 2010 11:59 AM0 commentsViews: 1

पिया हिंगोरानी, मुंबई

7 ऑक्टोबर

फॅशन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कुत्यूर फॅशन वीक मुंबईत सुरू झाला आहे.

या कुत्यूर वीकची सुरुवात झाली ती प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या फॅशन शोने… आणि मनिषच्या शोची शोस्टॉपर होती, ऐश्वर्या रॉय बच्चन…

या वीकला काल मुंबईत मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. मनिषने आपल्या या फॅशन शोसाठी खुद्द ऐश्वर्या रॉयलाच रॅम्प वॉकवर आणले… ऐश्वर्याने घातलेला पांढरा ड्रेस एखाद्या राणीप्रमाणे वाटत होता… यावेळी ऐश्वर्याला मॉडलिंगचे आपले जुने दिवस आठवले…

फॅशन वीकमध्ये जराही बदल झालेला नाही .. मॉडेल्सची धावपळ , कॉस्युमसाठीची पळापळ हे सारं तसंच आहे.. आणि मला ते सगळं परत आठवतंय, असे ती म्हणाली.

ऐश्वर्याला चिअर अप करण्यासाठी यावेळी जया बच्चन आणि अभिषेक बच्चनही आवर्जून उपस्थित होते.

फॅशन डिझायनर मोनिषा जयसिंगचा पहिल्याच दिवशी फॅशन शो झाला.

पण तिला मनिषप्रमाणे कुणी स्टार शोस्टॉपर यावेळी मिळाले नाही.

पहिल्या दिवसाप्रमाणे पुढेही या फॅशन वीकमध्ये अशीच रंगत राहील यात शंकाच नाही.

close