बिल्डिंग दुर्घटनेत 5 मृत्यूमुखी

October 7, 2010 12:08 PM0 commentsViews: 2

7 ऑक्टोबर

मुंबईच्या भेंडीबाजारमध्ये एका बिल्डिंगचा काही भाग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ढिगार्‍याखाली अडकलेल्या या लोकांना तातडीने जे. जे. हॉस्पिटलमध्ये ऍडमीट करण्यात आले. पण उपचारादरम्यान या पाच जणांचा मृत्यू झाला.

भेंडीबाजारमधील 56 द्वारकादास या बिल्डिंगचा पहिला मजला कोसळला. गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन बिल्डींगचा काही भाग कोसळल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र नेमके कारण कळू शकलेले नाही.

ढिगार्‍याखाली आणखी काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे.

राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 लाख, तर किरकोळ जखमींना 25 हजार रूपये आणि गंभीर जखमींना 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.

close