भारताच्या खात्यात 14 गोल्ड

October 7, 2010 12:55 PM0 commentsViews: 2

7 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्सच्या चौथ्या दिवशीही भारतीय खेळाडूंची गोल्डन कामगिरी सुरूच आहे. आज भारतीय खेळाडूंनी 3 गोल्ड मेडल पटकावली. त्यामुळे भारताच्या खात्यात आता एकूण 14 गोल्ड मेडल जमा झाली आहेत.

शूटिंगमध्ये दोन गोल्ड

भारतीय शूटर्सची गोल्डन कामगिरी स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही कायम आहे. शूटिंगमध्ये भारताने 2 गोल्ड मेडलची कमाई केली आहे. यातील पहिले गोल्ड मेडल पेअर इव्हेंटमध्ये मिळाले आहे.

25 मीटर रॅपिड फायर पिस्टल पेअर इव्हेंटमध्ये गुरप्रीत सिंग आणि विजय कुमार यांनी गोल्ड पटकावले. क्वालिफायिंग राऊंडमध्ये भारतीय जोडी 673 पॉईंटसह दुसर्‍या स्थानावर होती.पण त्यानंतर फायनलमध्ये आपली कामगिरी उंचावत त्यांनी गोल्ड जिंकले.

गुरुप्रीतला गोल्ड मेडल

गुरुप्रीतने आज भारताला दुसरे गोल्ड मिळवून दिले. 10 मीटर एअर पिस्टल पेअर इव्हेंटमध्ये गुरप्रीत सिंग आणि ओमकार सिंग या जोडीने भारताला गोल्ड मेडल जिंकून दिले. शूटिंगमधील भारताचे हे सातवे गोल्ड मेडल ठरले आहे.

भारताने शूटिंगमध्ये एका सिल्व्हर मेडलचीही कमाई केली. पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात रंजन सोढीने हे सिल्व्हर मेडल जिंकले. या प्रकारात भारताच्या आशर नोरियाला मात्र चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

50 मीटर थ्री पोझिशन प्रकारात मात्र भारताच्या पदरी आज अपयश आले. या प्रकारात लज्जा गोस्वामीला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

तर याच प्रकारातील वर्ल्ड चॅम्पियन तेजस्विनी सावंत तर फायनलसाठी क्वालिफायही झाली नाही. 568 च्या स्कोअरसह ती नवव्या स्थानावर फेकली गेली. लज्जाने 570 पॉईंट्स मिळवत फायनल गाठली.

पण फायनलमध्येही तिचा खेळ फारसा चांगला झाला नाही. आणि सहाव्या क्रमांकावरच तिला समाधान मानावे लागले. या प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या अलेथिया सेजमनने गोल्ड पटकावले.

close