अनिरूद्द देशपांडेंना लष्कर कोर्टाची नोटीस

October 7, 2010 2:55 PM0 commentsViews: 3

7 ऑक्टोबर

पुण्यातील सिटी कॉर्पोरेशनचे संचालक अनिरूद्द देशपांडे यांना जमिनीच्या कागदपत्रांमधे फेरफार केल्याप्रकरणी लष्कर कोर्टाने नोटीस बजावली आहे.

ऍमेनोरा पार्क या टाऊनशीप प्रकल्पासाठी राजेंद्र बगाडे या शेतकर्‍याच्या 25 गुंठे जमिनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून जमीन बळकावल्याप्रकरणी अनिरूध्द देशपांडेंसह दुय्यम निबंधक राजू नाईक, प्रदीप चव्हाण, अशोक तुपे यांच्याविरूध्द फसवणुकीचा आरोप केला गेला आहे.

देशपांडे यांनी आरोप फेटाळले असून येत्या 10 नोव्हेंबरला ते कोर्टात आपली बाजू मांडणार आहेत. पुण्याजवळ हडपसरमध्ये 450 एकरवर ऍमेनोरा टाऊनशीप प्रकल्प साकारला जात आहे. सिटी कॉर्पाेरेशन ग्रुपतर्फे या प्रकल्पाची उभारणी होत आहे.

close