प्रभाकर पेंढाकर यांचे निधन

October 7, 2010 3:15 PM0 commentsViews: 4

7 ऑक्टोबर

ज्येष्ठ लेखक आणि दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते.

प्रतिक्षा, आणि चिनार लाल झाला, अरे संसार संसार, रारंग ढांग आणि चक्रीवादळ या कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या आहेत. साधा माणूस या भालचंद्र पेंढारकरांच्या आत्मवृत्ताचे त्यांनी शब्दांकन केले आहे.

प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचे प्रभाकर चिरंजीव होत. भालजींच्या जयप्रभा स्टुडिओत त्यांनी सहायक दिग्दर्सक म्हणून काम केले होते.

फिल्म डिव्हिजनमध्ये कार्यकारी निर्माते म्हणून ते अनेक वर्षे कार्यरत होते.

शाब्बास सूनबाई, बाल शिवाजी, भाव तिथे देव या सिनेमांचे त्यांनी दिग्दर्शन केले.

close