वर्णद्वेषी उल्लेखाबद्दल न्यूझिलंडकडून माफी

October 7, 2010 5:52 PM0 commentsViews: 4

7 ऑगस्ट

न्यूझीलंडमधील एका टीव्ही अँकरने भारताबद्दल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याबद्दल वर्णद्वेषी उल्लेख केला होता.

त्याप्रकरणी भारताने तीव्र निषेध नोंदवल्यावर न्यूझीलंडने आता माफी मागितली आहे. झालेल्या प्रकाराबद्दल आपल्याला खेद वाटतो, असे न्यूझिलंडने म्हटले आहे.

टीएमझेड न्यूज चॅनेलचा अँकर पॉल हेन्री याने शीला दीक्षित यांच्या नावावरून असभ्य भाषेत टीका केली होती. त्यावर भारताने आक्षेप घेतला. न्यूझिलंडचे दिल्लीतील उच्चायुक्त रुपर्ट होलब्रो यांना समन्स बजावले. आणि हेन्रीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

न्यूझिलंडच्या उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या भोजनाच्या कार्यक्रमावरही भारताने बहिष्कार टाकला. सध्या हेन्रीला निलंबित करण्यात आले आहे.

close