लिऊ जियाबो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार

October 8, 2010 9:40 AM0 commentsViews: 7

8 ऑक्टोबर

2010 साठीच्या प्रतिष्ठेच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा आज झाली. चीनमधील मानवाधिकार कार्यकर्ते लिऊ जियाबो यांचा या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

जियाबो बंडखोर चिनी लेखक आहेत. 1989 मध्ये बिजींगमधील तियानमेन चौकात झालेल्या विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाचे ते सल्लागार होते.

चीनमध्ये राजकीय सुधारणांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सरकारच्या धोरणांना विरोध केल्याने त्यांना 11 वर्षांचा तुरुंगवासही झाला होता.

त्यांना नोबेल पुरस्कार देऊ नका, असा इशारा चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी गेल्याच महिन्यात नोबेल कमिटीला दिला होता.

close