सरकारकडून 10 रस्त्यांवरील टोलवसुली बंद

October 8, 2010 10:07 AM0 commentsViews: 14

8 ऑक्टोबर

राज्यात टोल वसुलीवरून ठिकठिकाणी होणार्‍या आंदोलनांची दखल घेत राज्य सरकारने राज्यातील 10 रस्त्यांवरील टोलवसुली कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर इतर तीन रस्त्यांवरील टोल वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

रस्ते खराब असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. नागरिकांचा विरोध वाढल्याने खराब रस्त्यावर टोलवसुली करु नये, अशी भूमिका राज्य सरकारला घ्यावी लागली आहे.

राज्यात सध्या 175 टोल वसुली नाके आहेत. टोल वसुलीसाठी ठेकेदारांना झुकते माप दिले जाते, असा ठपकाही कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला होता.

कुठल्या रस्त्यांवरची टोल वसुली बंद करण्यात आली आहे, यावर एक नजर टाकूया…

कायमचे टोल बंद केलेले रस्ते

कल्याण-बापगाव-पडघा रस्त्यावरील गांधारी पूल

कोपरणा-कोंडशी रस्ता

पालघर जवळचा वैतरणा पूल

बल्लारशा-आलापल्ली रस्ता

वर्धा – शेडगाव नदीवरील पूल

कुर्‍हा-आर्वी रस्ता

दर्यापूर-रामतीर्थ-म्हैसगंगा रस्ता

जळगाव-इंदगाव रस्त्यावरचा तापी नदीचा पूल

नागभीड-वर्सा रस्ता — नैनगंगा नदीवरचा पूल

अलुरपुरी-कवठे-वाडाधरी रस्त्यावरचा सांगवी पूल

तात्पुरती स्थगिती

मुब्रा-कवसा वळण रस्ता

टेंभुर्णी-कुर्डुवाडी-बार्शी-लातूर

अक्कलकोट-म्हैदर्गी-निंबाळा रस्ता

close