लवासाला राणेंचा ग्रीन सिग्नल

October 8, 2010 10:16 AM0 commentsViews: 2

8 ऑक्टोबर

अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आलेल्या लवासा प्रकल्पाच्या जमिनी नियमित करण्याचे आदेश महसूल मंत्री नारायण राणे यांनी दिले आहेत.

पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी लवासाची जमीन नियमित करुन घेण्याचे आदेश नारायण राणे यांनी दिलेत.

609 हेक्टर सिलिंग जमिन नियमित करण्याचे हे आदेश आहेत. कृष्णा खोरे महामहामंडळाचे 141 हेक्टर जमीन नियमित करण्याचे आदेशही राणेंनी दिलेत.

लवासाने जमीन व्यवहारात अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर नारायण राणे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

close