तुळजाभवानीच्या नवरात्रोत्सवाची तयारी

October 7, 2010 11:37 AM0 commentsViews: 3

7 ऑक्टोबर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

उद्या होणार्‍या घटस्थापनेनंतर देवीच्या नवरोत्रोत्सवाला सुरुवात होईल. यापुढचे नऊ दिवस देवी वेगवेगळ्या रुपात भक्तांना दर्शन देत असते.

तसेच देवीची रोज वेगवेगळ्या वाहनांवरुन मिरवणूक काढली जाते.

त्यासाठी मंदिरातील मिरवणुकीसाठीच्या वाहनांच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे.

मंदीर प्रशासनासोबत सुरक्षा व्यवस्थाही सुसज्ज झाली आहे.

एकूण 1200 पोलीस कर्मचार्‍यांसोबत 50 होमगार्ड 25 ट्रॅफिक पोलीस तसेच 100 महिला पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दर्शन रांगांसाठी होणारी गर्दी पाहता मंदीर प्रशासनाने दर्शन मंडपाची नव्याने उभारणी केली आहे.

तुळजापुरात प्रथमच दर्शन मंडपाद्वारे देवीचे दर्शन घेण्याचा लाभ भक्तांना मिळणार आहे.

close