बीडमध्ये मांत्रिकाच्या अघोरीकृत्यामुळे महिलेचे डोळे गेले

October 28, 2008 1:47 PM0 commentsViews: 14

28 ऑक्टोबर, बीडबीड जिल्ह्यातल्या मादळमोही इथल्या सुनीता रोहिदास वरपे यांनी डोळ्यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांना गेवराईच्या एस. वाय. अन्सारी या मांत्रिकाकडं उपचारासाठी नेल गेलं. त्या मांत्रिकानं डोळ्यात लिंबाचा रस पिळल्यानंतर दिसायचं बंद झालं, असं सुनीता यांचं म्हणणं आहे.नंतर सुनीता यांना अनेक डॉक्टरांकडं उपचारासाठी नेण्यात आलं. पण, त्यांची दृष्टी परत आली नाही. उपचारासाठी सुनीता यांच्याबरोबर गावातल्या सरपंच मंगल भोपळे या ही गेल्या होत्या. पण त्यांनाही या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलेलं दिसून येत नाही. मांत्रिकावर कारवाई करण्याची कोणतीही मागणी त्यांनी केली नाही. या सर्व प्रकारानंतरही अन्सारी या मांत्रिकावर अजूनपर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही. अन्सारीचा राजकीय वर्तुळात दबदबा असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची मागणीही कुणी करत नाही. पण या सगळ्यामध्ये पीडित महिलेला न्याय मिळेल का, या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही.

close