प्रतिभा मूर्ती हत्याप्रकरणी शिवकुमारला जन्मठेप

October 8, 2010 11:16 AM0 commentsViews: 3

8 ऑक्टोबर

प्रतिभा मूर्ती हत्या प्रकरणाचा निकाल काल लागला. मुख्य आरोपी शिवकुमारला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

2005 साली प्रतिभा मूर्ती ही बंगलोरच्या बीपीओमध्ये काम करत होती. ऑफिसला जात असताना प्रतिभाचा बलात्कार करून खून करण्यात आला होता.

तिच्या गाडीच्या ड्रायव्हर शिवकुमारनेच हे कृत्य केले होते. त्यानंतर आता बंगलोर फास्ट ट्रॅक कोर्टाने त्याला शिक्षा दिली आहे.

close