भारताच्या खात्यात 20 गोल्ड

October 8, 2010 1:30 PM0 commentsViews: 9

8 ऑक्टोबर

शूटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचा भारताचा धडाका कायम आहे. शूटिंगमध्ये भारताने आज तीन गोल्ड मेडल जिंकलीत. त्यामुळे आता शूटिंगमधील गोल्ड मेडलची संख्या 10 वर गेली आहे.

10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या ओमकार सिंगने गोल्ड मेडल जिंकली आहेत. फायनलमध्ये ओमकार सिंगने 681 पॉईंटची कमाई केली. सिंगापूरचा बिन गई या स्पर्धेत दुसरा आला. त्याने 676.2 पॉईंटची कमाई करत सिल्व्हर मेडल जिंकले.

तर ऑस्ट्रेलियाच्या डॅनिअलने 674 पॉईंटची कमाई करत ब्राँझ मेडल पटकावले. 2010च्या कॉमनवेल्थ गेम्समधील ओमकारचे हे दुसरे गोल्ड मेडल ठरले आहे.

एक नजर टाकूया भारताच्या आजच्या हिरोंवर…

विजय कुमार – 25 मीटर रॅपीड फायर पिस्तुल प्रकार – गोल्ड मेडल

गगन नारंग आणि इम्रान खान – 50 मीटर थ्री पोझीशन पेअर्स – गोल्ड मेडल

तिरंदाजी – रिकर्व्ह प्रकार – महिला टीमला गोल्ड मेडल

कुस्ती महिला गटात – अलका तोमर – 59 किलो वजनी गट

कुस्ती महिला गटात – अनिताने 67 किलो वजनी गटात गोल्डन कामगिरी केली आहे.

शूटिंगमध्ये धडाका

शूटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचा भारताचा धडाका कायम आहे. भारताच्या विजय कुमारने गोल्ड मेडल पटकावले आहे. शूटिंगमधील आज भारताचे हे दुसरे तर एकूण नववे गोल्ड मेडल ठरले आहे. 25 मीटर रॅपीड फायर पिस्तुल प्रकारात भारताच्या विजय कुमारने ही कामगिरी केली.

गोल्डन कामगिरी करताना विजयने 785.5 गुण मिळवत नवीन गेम्स रेकॉर्डही केला आहे. भारताच्या गुरूप्रित सिंगनेही या प्रकारात ब्राँझ मेडल पटकावले. त्याने 758.7 गुण पटकावले आहेत.

गगन नारंगची चमक

शूटिंगमध्ये 50 मीटर थ्री पोझीशन पेअर्समध्ये भारताच्या गगन नारंग आणि इम्रान खान यांनी गोल्डवर कब्जा केलाय आहे. गोल्ड पटकावताना त्यांनी नवीन कॉमनवेल्थ रेकॉर्डही केला.

याआधी गगन नारंगने 10 मीटर एअर रायफल पेअर्समध्ये अभिनव बिंद्राबरोबर गोल्डन कामगिरी केली होती. तर याच प्रकारात वैयक्तिक गोल्ड मेडलही जिंकले होते. कॉमनवेल्थ गेम्समध्ये गगन नारंगनं गोल्ड मेडलची हॅट्‌ट्रीक केली आहे.

पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात मात्र भारताला गोल्ड मेडलने हुलकावणी दिली. ऑस्ट्रेलियन जोडीने दोनशे पैकी 198 पॉईंट्स मिळवले. मानवजीत संधु आणि मनशेर सिंग यांनी त्यांना तगडी लढत दिली. आणि स्पर्धेतील चुरस शेवटच्या क्षणापर्यंत कायम होती. पण अखेर गोल्डसाठी त्यांना अवघा एक पॉईंट कमी पडला.

कुस्तीत दोन गोल्ड

शूटिंगसोबतच भारताने आज कुस्तीतही दोन गोल्ड मेडल पटकावले. 59 किलो वजनी गटात भारताच्या अलका तोमरने गोल्डन कामगिरी केली.

फायनलमध्ये कॅनडाच्या तोन्या वरबिकला हरवत तिने भारताला गोल्ड मिळवून दिले. महिला कुस्तीमध्ये भारताचे हे दुसरे गोल्ड मेडल आहे. याअगोदर गिता कुमारीने काल कुस्तीमध्ये गोल्ड पटकावले होते. दुसरीकडे 67 किलो वजनी गटात भारताच्या अनिताने गोल्ड पटकावले.

अनिताने कॅनडाच्या मेगान बायडेनचा पराभव केला. महिला कुस्तीतील भारताचे हे तिसरे गोल्ड मेडल ठरले आहे.