लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताचं ट्रेडिंग नऊ हजारावर

October 28, 2008 3:43 PM0 commentsViews: 7

शेअरमार्केटमध्ये यंदा जागतिक मंदीचं सावट आहे. त्यामुळं दिवाळी असूनही फारसा उत्साह नाही. शेअरबाजारात लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व आहे. मंदी विसरून इथं लक्ष्मीपूजन साजरं झालं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभर ट्रेडिंग बंद असतं. मात्र बीएसई बिल्डिंगमधल्या हॉलमध्ये एका स्पेशल बोल्टवर मुहूर्ताचं म्हणून ट्रेडिंग केलं जातं. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सव्वासहा वाजता हे ट्रेडिंग सुरू झालं आणि ते साडेआठपर्यंत चाललं. काल आठ हजारांच्या खाली गेलेला सेन्सेक्स आज नऊ हजारावर पोचला. सेन्सेक्स नऊ हजार एकतीस अंशावर बंद झाला.आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मंदी असूनही प्रत्येक सेक्टरमध्ये पाच ते आठ टक्क्यांची वाढ दिसली.

close