खेडमध्ये घरे जाळण्याचे प्रकार सुरूच

October 8, 2010 1:50 PM0 commentsViews: 6

8 ऑक्टोबर

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यानंतर गावामध्ये दहशत पसरली आहे.

कारण चिंचबाई गावात निवडणुकीच्या वादातून चार घरे जाळण्याचा प्रकार घडला आहे.

तेही चक्क पोलिसांच्या उपस्थितीत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना पकडले.

पण तरीही काही दिवसांपासून घरांवर दगड मारणे, घरे पेटवून देणे नित्याचे झाले आहे.

या घटनांची तक्रार पोलिसांत देऊनही अजून पंचनामाही झालेला नाही.

मुख्य म्हणजे याच गावाला 2009 चा तंटामुक्ती अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाला आहे.

close