नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत 8 ठार

October 8, 2010 1:52 PM0 commentsViews: 4

8 ऑक्टोबर

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत आज आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर ही चकमक झाली. सावरगाव आणि कोहका गावाच्या हद्दीवर ही घटना घडली.

त्यात तीन जवान शहीद झालेत. तर मृतांमध्ये तीन विद्यार्थी, एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

तसेच इतर नऊ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गडचिरोलीतील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

विशेष म्हणजे आजच्याच दिवशी गेल्या वर्षी 17 पोलीस जवान नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाले होते.

close