दसरा मेळाव्यासाठी शिवसेना हायकोर्टात

October 8, 2010 1:55 PM0 commentsViews: 7

8 ऑक्टोबर

शिवाजी पार्कवर होणार्‍या शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

पण आता शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर आज सुनावणी झाली. महापालिकेला परवानगी देण्यास काही हरकत आहे का? असे कोर्टाने विचारल्यानंतर महापालिकेनं काहीही हरकत नसल्याचे कोर्टात सांगितले.

आता या याचिकेवरील पुढची सुनावणी सोमवारी होणार आहे.

close