अयोध्येबाबत कोर्टाबाहेर तडजोडीची शक्यता

October 8, 2010 3:35 PM0 commentsViews: 2

8 ऑक्टोबर

अयोध्येचा मुद्द्यावर कोर्टाबाहेर तडजोडीची शक्यता निर्माण झाली आहे. सुप्रीम कोर्टात न जाता हा मुद्दा कोर्टाबाहेर सोडवावा यासाठी प्रयत्न सुरू झालेत. या केसशी संबंधित तीनही पक्षांची आज पहिलीच बैठक पार पडली.

या बैठकीत राम लल्लाचे प्रतिनिधी पहिल्यांदाच सहभागी झाले. निर्मोही आखाड्याचे महंत भास्कर दास, हाशीम अन्सारी आणि राम लल्लाचे प्रतिनिधी त्रिलोकी नाथ पांडे हे या बैठकीत हजर होते.

अयोध्येतील हनुमान गढीवर ही बैठक झाली. आजच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसला, तरी चर्चेला सुरुवात झाली, ही महत्त्वाची गोष्ट आहे.

close