बिहारी नेत्यांनो आगीत तेल ओतू नका, उद्धव ठाकरे यांचा इशारा

October 28, 2008 4:51 PM0 commentsViews: 4

28 ऑक्टोबर- लालूप्रसाद यादव यांनी काड्या घालण्याचे उद्योग करू नये.बिहारमध्ये काय चाललंय ते आधी पाहावं. बिहार सोडून लोक का बाहेर जात आहे. हे त्यांनी आधी पाहावं. बिहारच्या जनतेचे खरे गुन्हेगार त्यांचे नेतेच आहेत, असं शिवसेना कार्याध्यक्षउद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मुंबई पोलिसांच्या कारवाईत मारला गेलेला राहुल राज प्रकरणी बिहारी नेत्यांच्या एकजुटीवरउद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले महाराष्ट्राला इथल्या लोकांना शिकवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये.छटपूजेविषयी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की छटपूजेवर अनेक मोठे नेते बोलत आहे. आपापली धोरणं मांडत आहेत म्हणून त्यांच्या मानाने मी लहान असल्यामुळे मी माझे विचार याविषयावर मांडत नाही. आज उत्तरेकडचे नेते एकत्र आले आहेत. त्यांनी आपली एकजूट अशीच टिकून ठेवली तर उत्तरेकडच्या राज्याचा विकास नक्की होईल असा टोलाही त्यांनी या पत्रकार परिषदेत लगावला.

close