ऑस्ट्रेलियाचे 285 रन्स

October 9, 2010 12:15 PM0 commentsViews: 3

9 ऑक्टोबर

बंगलोर टेस्टच्या पहिल्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाने 5 विकेट गमावत 285 रन्स केले आहेत. दिवसअखेर मार्कस नॉर्थ 43 तर टीम पेन 8 रन्सवर खेळत होते.

त्याआधी हरभजन सिंग आणि प्रग्यान ओझा या भारताच्या स्पीन जोडीने सुरुवातीला तीन विकेट झटपट मिळवून दिल्या. तर झहीर खानने मायकेल हसीचा अडथळा दूर केला.

पण त्यानंतर मात्र भारतीय बॉलर्सना यश मिळालेले नाही. कॅप्टन रिकी पॉण्टिंगने सावध बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाची इनिंग सावरली. पण त्याची इनिंग सुरेश रैनाने संपवली. पॉण्टिंग 77 रन्सवर आऊट झाला.

भारतातर्फे हरभजनने सर्वाधिक 2, रैना, ओझा आणि झहीर खानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

close