मेडल्सची हाफ सेंच्युरी…

October 9, 2010 1:07 PM0 commentsViews: 7

9 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची गोल्डन कामगिरी सुरुच आहे. आज स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताने मेडल्सची हाफ सेंच्युरीही पूर्ण केली.

भारताने मेडल टॅलीत 50 मेडल्सचा आकडा पार केला आहे. भारताच्या खात्यात आता 55 मेडल्स जमा झालीत. आणि कॉमनवेल्थच्या इतिहासात अशी कामगिरी करण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे.

याअगोदर 2002 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने एकूण 69 मेडल्सची कमाई केली होती. अजूनही स्पर्धा संपण्यासाठी अवकाश असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत 24 गोल्ड, 16 सिल्वर तर 15 ब्राँझ मेडल्सची कमाई केली आहे.

एक नजर टाकूयात आजच्या हिरोंवर…

गगन नारंग – 50 मीटर रायफल थ्री पोझिशन – गोल्ड मेडल

विजय कुमार आणि हरप्रीत सिंग – 25 मीटर सेंटर सेंटरफायनल पिस्टल प्रकार

योगेश्वर दत्त – 60 किलो वजनी गट – कुस्ती

नरसिंग यादव – 74 किलो वजनी गट – कुस्ती

शूटिंगमध्ये 12 गोल्ड

भारतीय शुटर्सनं कॉमनवेल्थ गेम्समध्ये 6 दिवसात 12 गोल्ड मेडलची नोंद केली आहे. आज भारताने आणखी 2 गोल्ड मेडल तर 1 ब्राँझ मेडल्सची कमाई केली.

भारताच्या गगन नारंगने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताला गोल्ड मेडल जिंकून दिले. गगनने 1262.2 पॉईंटची नोंद करताना नवा कॉमनवेल्थ गेम्स रेकॉर्डही केला.

या स्पर्धेतील गगनचे हे सलग चौथे गोल्ड मेडल ठरले आहे. याच प्रकारात भारताच्या इम्रान हसन खानला मात्र चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

कॉमनवेल्थमध्ये आज सहाव्या दिवशी भारताने पहिले गोल्ड मिळवले ते नेमबाजीतच. 25 मीटर सेंटर फायर पिस्टल प्रकारात विजय कुमार आणि हरप्रीत सिंग यांनी गोल्डची कमाई केली. विजय कुमारसाठी ही स्पर्धा स्वप्नवत आहेा. स्पर्धेतील आतापर्यंतचे तिसरे गोल्ड त्याने जिंकले आहे.

तर शूटिंगमध्ये भारताने आज एका ब्राँझ मेडलचीही कमाई केली. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल पेअर प्रकारात सुमा शिरुर आणि कविता यादव यांना ब्राँझवर समाधान मानावे लागले.

सुमा – कविता जोडीने 785 पॉईंटची नोंद केली. या प्रकारात मलेशियाने 793 पॉईंटसह गोल्ड तर सिंगापूरने 790 पॉईंटसह सिल्व्हर मेडल पटकावले.

close