हृतिकने केले औरंगाबादमध्ये मॉलचे उदघाटन

October 9, 2010 2:40 PM0 commentsViews: 6

9 ऑक्टोबर

औरंगाबादमध्ये सुरु करण्यात आलेल्या प्रोझोन मॉलचे उदघाटन अभिनेता हृतिक रोशन याच्या हस्ते आज झाले. पण नियोजना अभावी मॉलच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला.

संयोजकाकडून ठेवण्यात आलेल्या सिक्युरिटींनीच धक्काबुक्की केल्याने अनेक महिला खाली पडल्या. धक्काबुक्की झालेल्या लोकांनी संयोजकाकडे दाद मागितल्यानंतर नागरिकांनाच शिवीगाळ करण्यात आली.

यात मीडियाही सुटला नाही. त्यामुळे पत्रकारांनी उदघाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तर मॉलच्या बाहेर प्रचंड गर्दी असल्यानं पोलिसानी लाठीहल्ला केला.

विशेष म्हणजे यात काही पोलीसच जखमी झाल्याचे पीआय नामदेव ठोंबरे यांनी सांगितले. त्यामुळे हृतिकला पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा मात्र हिरमोड झाला.

close