भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झालं बजरंग दलाचं शिबिर

October 29, 2008 7:16 AM0 commentsViews: 26

29 ऑक्टोबर, नाशिक ,प्रशांत कोरटकरमालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात हिंदू अतिरेक्यांना अटक केल्यानंतर एटीएसनं संघपरिवाराशी संबंधित संस्थांच्या कामाची माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी नागपुरच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचं ट्रेनिंग झालं, असं उघड झालं. 2001 ते 2003 असं तब्बल तीन वर्ष हे ट्रेनिंग सुरु होतं. मात्र हे ट्रेनिंग व्यक्तिमत्व विकासासाठी होतं असा खुलासा भोसला मिलिटरी स्कूलच्या संचालकांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केला.नागपुरपासून तीस किलोमीटर वर भोसला मिलिटरी स्कूल आहे. सैन्यात भरती करण्यासाठी अधिकारी तयार करण्याचा संस्थेचा उद्देश आहे.नाशिकमध्ये जी भोसला मिलिटरी स्कूल आहे, त्याचीच ही नागपुरमधली शाखा आहे. या मिलिटरी स्कूलमध्ये फायरिंग रेंजही आहे. तिथं गोळीबाराचा सराव होतो. स्कूलमध्ये रायफल ट्रेनिंग आणि इतर मिलिटरी ट्रेनिंगचीही सोय आहे. मात्र इथं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचं ट्रेनिंग झाल्याचं उघड झाल्याने ही इन्स्टिट्यूट वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.संस्थेच्या संचालकांनीही हे ट्रेनिंग झाल्याचं मान्य केलं. मात्र याच वेळी ' हे केवळ व्यक्तिमत्व विकास शिबिर होतं. एटीएसने यासंदर्भात फक्त एकदा चौकशी केली. त्यानंतर त्यांचं समाधान झालं. आत्ताही आम्ही चौकशीस पूर्ण सहकार्य करू ' अशी प्रतिक्रिया या इन्स्टिट्यूटचे संचालक सतीश साल्पेकर यांनी दिली. 'भोसला मिलिटरी स्कूलमध्ये ज्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ट्रेनिंग घेतलं त्यापैकी दोघं नांदेडमध्ये बॉम्ब बनवताना स्फोट होऊन ठार झाले. या ट्रेनिंगमध्ये दोन रिटायर्ड आर्मी ऑफिसर आणि इंटेलिजन्स एजन्सीचा रिटायर्ड सिनियर ऑफिसरही सहभागी झाला होता. देशातल्या अतिरेकी कारवायांवर नजर ठेवण्याचं काम इंटेलिजन्स एजन्सी करते. त्यातल्याच सिनियर ऑफिसरनं या ट्रेनिंगमध्ये भाग घेतल्याने या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे. एटीएसला पुण्याच्या सनतकुमार भाटे यांनी एक स्टेटमेंट दिलं. भोसलामध्ये जे ट्रेनिंग झालं त्यात भाटे सहभागी होते. भोसलातील ट्रेनिंग हे तरुणांना दिशाभूल करणारं होतं असं भाटे यांनी एटीएसला सांगितलंभोसला मिलिटरी स्कूल ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील संस्था आहे. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे ही संस्था चालवली जाते. या संस्थेचे पदाधिकारी कोण असावेत हे संघातर्फे ठरवलं जातं. त्यामुळे या संस्थेच्या उद्देशाविषयी प्रश्नचिन्हं निर्माण झालं आहे.

close