रवी पाटील हत्येप्रकरणी चौघे अटकेत

October 9, 2010 4:28 PM0 commentsViews: 2

9 ऑक्टोबर

वांगणीतील काँग्रेसचे नेते रवी पाटील यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी गोळ्या घालून रवी पाटील यांची हत्या करण्यात आली होती.

अरिफ मोहम्मद, मोसिन खान, फिरोज सिद्दिकी अन्सारी, इम्रान नसीर खान, निसार नसीर खान अशी या आरोपींची नावे आहेत. बदलापूर पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांची चार पथके या मारेकर्‍यांचा शोध घेत होती. 7 ऑक्टोबरला रवींद्र सुदाम पाटील यांची हत्या करण्यात आली होती.

बारा वर्षांपूर्वी आरोपीच्या काकांची हत्या करण्यात आली होती. आणि त्या घटनेतील आरोपींना रवी पाटील यांनी त्याकाळी मदत केली, अशा प्रकारच्या समजातून ही हत्या झाली आहे.

close