लवासा प्रकरणी जेलभरो-अण्णा

October 10, 2010 12:37 PM0 commentsViews: 2

10 ऑक्टोंबर

लवासाप्रकरणी राज्य सरकारचा निर्णय हा दुदैवी आहे, धनदांडग्यांना पाठीशी घालण्याचाच हा एक प्रकार आहे अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वीच महसूल विभागाने लवासा प्रकल्पाची जमीन नियमित करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले होते.

पण अशा कारभारामुळे, धनदांडग्यासाठी गरिबांची गळचेपी होत असल्याचा आरोपही अण्णा हजारेंनी केला आहे.

या प्रकरणी जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही अण्णांनी दिला.

close