आयपीएल 4 मधून पंजाब आणि राजस्थान टीम्सना वगळले

October 10, 2010 12:54 PM0 commentsViews: 3

10 ऑक्टोंबर

आयपीएलमधल्या किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या टीम अखेर बीसीसीआयने बरखास्त केल्या आहे.

शिवाय कोची टीमलाही मालकी हक्कांवरुन सुरु असलेले वाद लवकर मिटवा अशी नोटीस पाठवण्यात आली.

या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची एक तातडीची बैठक आज मुंबईत झाली.

आणि या बैठकीतच दोन्ही फ्रँचाईजींबरोबरचा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या दोन्ही टीम्सच्या मालकांनी आयपीएलबरोबर झालेल्या कराराचा भंग केल्याचे बीसीसीआयचे म्हणणे आहे.

बीसीसीआयने वकिलांचा सल्ला घेतल्यानंतर ही कारवाई केली. शिवाय नव्याने स्थापन झालेल्या कोची टीममध्येही मालकी हक्कावरुन सध्या वाद सुरु आहेत.

रान्देवू स्पोर्ट्स कन्सोर्टियमच्या सदस्यांमध्ये दोन तट पडल्याचे बोलले जात आहे.

हे वाद मिटवून टीमचे मालकी हक्क पुन्हा उघड करण्याचे निर्देश बीसीसीआयने कोची टीमला दिले.

सुनंदा पुष्कर यांचाही टीममधला हिस्सा रद्द करायला सांगितला आहे.

शिल्पाला जबरदस्त धक्का

आयपीएलच्या चौथ्या हंगामातून बाहेर पडल्याने राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन्ही टीम्सना जबरदस्त धक्का बसला आहे.

राजस्थान रॉयल्सचा करार रद्द केल्यानंतर टीमची मालक शिल्पा शेट्टी आणि कॅप्टन शेन वॉर्न यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिल्पा शेट्टी म्हणते की, माझ्यासाठी खरंच हा मोठा धक्का आहे. कारण राजस्थान रॉयल्स आमच्यासाठी टीमपेक्षा बरंच काही आहे.

अजून करार रद्द केल्याची कोणतीही कागदपत्रे आम्हाला मिळालेली नाहीत. सध्या मी लंडनला आहे, त्यामुळे अधिक माहिती कळलेली नाही.

तर शेन वॉर्ननं म्हणतो की, आयपीएल सीझन-4 मधून राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन टीमला वगळण्यात आले हा राजस्थान रॉयल्ससाठी मोठा धक्का आहे. यावर नक्कीच काहीतरी तोडगा निघेल अशी आशा आहे.

close