स्फोटामध्ये आणखी एकाचा मृत्यू

October 10, 2010 1:01 PM0 commentsViews: 6

10 ऑक्टोंबर

गडचिरोलीमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांत झालेल्या चकमकीत शाळेवर ग्रेनेड पडून झालेल्या स्फोटामध्ये गंभीर जखमी झालेल्या आणखी एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

मुखेश पोटावी हा 10 वर्षाचा शाळकरी मुलगा या स्फोटातील तिसरा बळी ठरला आहे.

त्याचा काल रात्री नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यू झाला. या स्फोटात अगोदर 2 जण ठार झाले होते.

तर 11 विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. मुखेश हा त्यापैकीच एक आहे.

close