सचिनची टेस्ट क्रिकेटमध्ये 14 हजार रन्स पूर्ण

October 10, 2010 1:14 PM0 commentsViews:

10 ऑक्टोंबर

बंगलोर टेस्टमध्ये फॉलोऑन टाळण्यासाठी आणि पहिल्या इनिंगमध्ये चांगला स्कोअर उभारण्यासाठी भारतीय टीमची झुंज सुरु आहे.

सचिन आणि मुरली विजय यांनी हाफ सेंच्युरी पार्टनरशिप केली.

त्याचवेळी सचिन तेंडुलकरने टेस्ट कारकीर्दीत आणखी एक टप्पा ओलांडला आहे.

चौदा हजार रन्स पूर्ण करणारा तो पहिला बॅट्समन ठरला आहे. ह्युरित्झच्या बॉलिंगवर फोर मारुन सचिनने हा टप्पा ओलांडला.

आणि बॅट उंचावून सचिनने आपला आनंद व्यक्त केला. ऑस्ट्रेलियन कॅप्टन रिकी पाँटिंगनेही पुढे येऊन सचिनचं अभिनंदन केले.

171व्या टेस्टमध्ये सचिनने ही कामगिरी केली. आणि त्याचे ऍव्हरेजही 56.11 असे आहे.

सचिनच्या नावावर सर्वाधिक म्हणजे 48 टेस्ट सेंच्युरी जमा आहेत.

close