हरबन्स सिंह यांच्यासह तीन खाजगी सुरक्षारक्षकांना अटक

October 10, 2010 1:42 PM0 commentsViews: 4

10 ऑक्टोंबर

नवी मुंबईत सानपाडा इथे सिग्नलवर राडा घालणारे कांग्रेसचे नेते हरबन्स सिंह यांच्यासह त्यांच्या तीन खाजगी सुरक्षारक्षकांना तुर्भे पोलिसांनी अटक केली.

हरबन्स सिंह यांच्या सुरक्षारक्षकांनी हातातील रायफल्स दाखवून एका उद्योजकाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला.

सानपाडा जंक्शनजवळ उजवीकडे वळण्याची घाई असलेल्या हरबन्स सिंह यांनी त्यांच्या गाडीच्या पुढे उभ्या असलेल्या गाडीच्या मालकाला अश्लील शिवीगाळ केली.

तसेच त्यांच्या खाजगी सुरक्षारक्षकाने रायफल रोखून गोळ्या घालण्याची धमकी दिली होती.

हरबन्स सिंह हे कृपाशंकर सिंह यांचे मेव्हणे आहेत.

close