मनसेचे 100 उमेदवार जाहीर

October 10, 2010 1:45 PM0 commentsViews: 3

10 ऑक्टोंबर

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी मनसेने 100 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

मनसे इथे संपुर्ण म्हणजे 107 जागांसाठी निवडणूक लढवणार आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत आज उमेदवारांची ही यादी जाहीर केली.

कल्याण डोंबिवली निवडणुकीत आपल्याला विजयाची खात्री आहे, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

उमेदवारी यादीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला जास्त संधी दिली आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितले.

तसेच माझा जाहीरनामा नाही तर वचकनामा लवकरच येणार आहे, असंही ते म्हणाले.

कल्याण-डोंबिवलीला आदर्श शहर बनवायचे आहे. त्यासाठी मला आजमावून बघा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोल्हापुरात मात्र यावेळेस निवडणूक लढवणार नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. कोल्हापुरकरांवर माझा राग नाही.

मात्र कोल्हापुरात अजून पक्षबांधणी बाकी असल्याने तिथे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

close