मुख्यमंत्र्यांच्या घरी नवरात्रीचा थाटमाट

October 10, 2010 5:40 PM0 commentsViews: 2

10 ऑक्टोंबर

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडच्या घरीही नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.

यंदाच्या वर्षी त्यांच्या घरी 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमाचा भव्य सेट उभारण्यात आला आहे.

या सिनेमातल्या ढोली तारो ढोल बाजे या गाण्यातल्या हा सेट आहे. 24 मोठे खांब आणि 4 मोठ्या दिपमाळांनी हा भव्य सेट बांधण्यात आला.

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी हा सेट उभारला आहे. 55 कारागिरांनी हया सेटसाठी वीस दिवस मेहनत घेतली.

हा सेट उभारण्यासाठी 12 ते 15 लाख रुपये खर्च आला आहे. या सेटमध्ये दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

close