उद्या काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार

October 10, 2010 5:42 PM0 commentsViews: 2

10 ऑक्टोंबर

कोल्हापूर महापालिका निवडणुकीतल्या जागावाटपातला तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक आज मुबईत झाली.

गटातटाच्या राजकारणात अडकेलेल्या काँग्रेसला अखेर आज आपल्या नेत्यांमध्ये तडजोडी घडवून आणता आल्या.

आज दुपारी दोन वाजेपर्यंत हा घोळ मिटेल, असे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले होते. तरी वाटाघाटी संपायला सहा वाजले.

उद्या काँग्रेसची इथली पहिली यादी जाहीर केली जाणार आहे.

आत्तापर्यंत 69 जागांवर उमेदवार निश्चित झालेत, तर उरलेल्या 8 जागांवर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी दिली.

close