राष्ट्रपती राजवटीची शिफारस

October 11, 2010 10:18 AM0 commentsViews: 2

11 ऑक्टोबर

कर्नाटकात अखेर भाजपनने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे येडुयुरप्पा यांचे सरकारच कायम राहणार आहे.

पण कर्नाटकमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपाल हंसराज भारद्वाज यांनी केली आहे.

बंडखोर आमदारांना अपात्र ठरवणे, हा निर्णय असंवैधानिक आहे, असे राज्यपालांनी आपल्या शिफारसीमध्ये म्हटले आहे.

येडुयिरप्पा सरकारच्या विरोधात 16 आमदारांनी बंडखोरी केली होती. या बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले होते.

आजच्या विश्वासदर्शक ठरावात हे आमदार सहभागी होऊ शकणार नव्हते. त्यामुळे या आमदारांनी कर्नाटक विधासभेच्या बाहेरच गोंधळ घातला.

या सर्व गोंधळातच आवाजी मतदानाने येडुयिरप्पा यांनी बहुमत सिद्ध केले.

close