दसरा मेळाव्यास हाय कोर्टाची परवानगी

October 11, 2010 10:35 AM0 commentsViews: 2

11 ऑक्टोबर

शिवाजी पार्कवर होणार्‍या शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्याला हाय कोर्टाने परवानगी दिली आहे. दसरा मेळाव्याला परवानगी मिळवण्यासाठी शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

परवानगी देताना हायकोर्टाने काही अटी मात्र घातल्या आहेत. या मेळाव्यात 50 डेसिबल्सपेक्षा जास्त आवाज होता कामा नये, असे कोर्टाने सांगितले आहे.

कारण याअगोदर हायकोर्टाने शिवाजी पार्कला सायलेन्स झोन म्हणून घोषित केले आहे.

शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान नसून ते रिक्रिएशन ग्राऊंड आहे. त्यामुळे या शिवाजी पार्कवर सांस्कृतिक कार्यक्रमही होऊ शकतात, असे शिवसेनेतर्फे कोर्टात सांगण्यात आले.

जर दसरा मेळाव्याला परवानगी तर तुमचा काही आक्षेप आहे का अशी विचारणा याआधी कोर्टाने महापालिकेला केली होती, त्यावर आज महापालिकेने आपल्याला आक्षेप नसल्याचे कोर्टाला सांगितले.

close