रखुमाईमाता मनोहारी रुपात

October 11, 2010 10:46 AM0 commentsViews: 25

11 ऑक्टोबर

नवरात्रानिमित्त पंढरपुरच्या श्री रूक्मिणीमातेला बैठा पोशाख करण्यात आला होता.

पंढरीची रखुमाई विठ्ठलाप्रमाणेच कमरेवर हात ठेऊन उभी आहे. मात्र नवरात्राच्या निमित्ताने रखुमाईला बैठक देण्यात आली होती.

कपड्यांची कलात्मक मांडणी करून हा अनोखा पोशाख आणि विविध अलंकारांनी देवीला नटवण्यात आले होते.

रखुमाईचे हे रुप डोळ्यांत साठवून घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती.

श्री रूक्मिणीमातेप्रमाणेच सावळ्या विठ्ठलालाही निळ्या रंगाचा रेशमी अंगरखा व मोरपंखी रंगाचे धोतर नेसवण्यात आले होते.

तसेच मोत्याचे अलंकार घालण्यात आले होते.

या अलंकारातील वैशिष्ट्य म्हणजे पेशव्यांनी दिलेला नवरत्नांचा हार विठ्ठलाच्या कमरेला लावण्यात आला होता.

त्यामुळे विठ्ठलाचे रूप अधिकच विलोभनीय दिसत होते.

close