आरोग्यदेवतेच्या दर्शनासाठी चंद्रपुरात गर्दी

October 11, 2010 11:00 AM0 commentsViews: 2

11 ऑक्टोबर

नवरात्रीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्यदेवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवी महाकालीच्या दर्शनाला भक्तांची गर्दी उसळत आहे.

ही देवी नवसाला पावते, असा भक्तांचा विश्वास आहे.

त्यामुळे राज्यभरातून या देवीच्या दर्शनासाठी चंद्रपूरमध्ये भाविक दाखल होतात.

चंद्रपूरच्या गोंडराज वीरशहाची राणी हिराई हिने या मंदिराचा 1627 मध्ये जिर्णोद्धार केला होता.

close