मुंबईत कंपन्यांना लागणार्‍या सततच्या आगींमागे कंपनीचे मालक ?

October 29, 2008 7:40 AM0 commentsViews: 4

29 ऑक्टोबर, मुंबईविनय म्हात्रेसोमवारी पुन्हा एकदा नवी मुंबईत एका कंपनीला आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. अशा अनेक कंपन्या राज्यात सध्या जळत आहेत. सुरुवातीला शॉर्टसर्किटच कारण सांगितलं जातं. पण चौकशीनंतरही या घटनेचं खरं कारण पुढे आणलं जात नाही. अजून पर्यंत आगीसाठी जबाबदार ठरवून एकाही कंपनीच्या मालकावर कारवाई झालेली नाहीय्. आणि त्यातही सगळे नियम धाब्यावर बसवून मालक मात्र पुन्हा इन्शुरसन्स घेण्यासाठी तयार असतो.रिलायन्स सिलिकॉन ही अमिताभ बच्चन यांचा भाऊ अजिताभ बच्चन यांची कंपनी. ही कंपनी अनेक वर्षापासून जळलेल्या अवस्थेत आहे. तब्बल पंचेचाळीस दिवस या कंपनीचे कर्मचारी सावला कोल्ड स्टोरेजची आग विझवत होते. यासारख्या अनेक कंपन्या आहेत जिथे आग विझवण्याची कोणतीच यंत्रणा नाही. अनधिकृत बांधकामामुळे आग विझवताना कर्मचार्‍यांची दमछाक होते, आणि कंपनी जळाल्यानंतर कामगार देशोधोडीला लागतात. या सगळ्या परिस्थितीकडे खरचं कुणीतरी लक्ष देतंय का ? असा प्रश्न कामगारांना पडला आहे.कामगार मंत्री गणेश नाईक यांनी राज्यातील सर्व कंपन्यांचा सर्व्हे केला. जी कंपनी सुरक्षा यंत्रणेचा काटेकोरपणे पालन करेल त्या कंपनीला बक्षीस दिलं जाईल आणि जी कंपनी पालन करत नसेल तिच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र अशी एकही कारवाई न केली गेल्यानं कंपन्या बिनधास्त आहेत.दरवर्षी कंपनीचं नूतनीकरण करताना कंपनीची फायर यंत्रणा, मार्जिनल स्पेस, मालाची आकडेवारी घेतल्यावरच परवानगी दिली गेली तर अशा घटना टाळता येतील. कंपनीचं उत्पादन वाढवण्यासाठी मालकाकडून अनेक योजना राबवल्या जातात, त्यावर पाण्यासारखा पैसाही खर्च केला जातो. पण जेव्हा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा हात आखडता घेतला जातो. या सगळ्या प्रकरणात भरडले जातात ते कामगार आणि मालकावर मात्र कारवाई शून्य. याला जबाबदार कोण शासन की मालक, हाच प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

close