बंदीनंतरही अवैध वाळूउपसा सुरुच

October 11, 2010 11:22 AM0 commentsViews: 2

11 ऑक्टोबर

वाळू उपसा आणि वाहतूक यावर हाय कोर्टाने बंदी घातली आहे. पण पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील वाळू उपसा आणि वाहतूक दिवसाढवळ्याही बिनदिक्कत सुरू आहे.

शिरूर तालुक्यातून आणलेल्या वाळूची आळेफाटा – मंचर मार्गावर ट्रकने वाहतूक सुरू होती.

याबाबत पत्रकारांनीच वाहतूक पोलिसांना ही गोष्ट लक्षात आणून दिली.

त्यानंतर पोलिसांनी तात्पुरती कारवाई केली. प्रत्यक्षात मात्र या वाळू वाहतुकीला पोलिसांचेच अभय असल्याचे वारंवार दिसून येत आहे.

close