सचिनने मोडला लाराचा विक्रम

October 11, 2010 11:28 AM0 commentsViews: 2

11 ऑक्टोबर

बंगलोर टेस्टमध्ये सचिनने आणखी एक रेकॉर्ड मागे टाकला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 150 रन्स करण्याचा वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराचा रेकॉर्ड त्याने मोडला आहे.

लाराच्या नावावर 19वेळा हा रेकॉर्ड होता. तर सचिनने टेस्ट क्रिकेटमध्ये तब्बल 20 वेळा 150 रन्स केलेत. त्याआधी त्याने शानदार सेंच्युरी ठोकत टेस्टमधील आपली 49 वी सेंच्युरी पूर्ण केली आहे.

2 सिक्स आणि 15 फोर ठोकत सचिनने ही शानदार सेंच्युरी ठोकली आहे. 93 रनवर असताना सचिनने ह्युरित्झला जोरदार सिक्स लगावली.

आणि तो सेंच्युरीच्या जवळ पोहोचला. त्यानंतर पुन्हा एकदा सिक्स मारुन त्याने आपली सेंच्युरी पूर्ण केली.

चिन्नास्वामी स्टेडियम सचिनसाठी पुन्हा एकदा लकी ठरले आहे. खासकरुन ऑस्ट्रेलियाविरुद्ध या स्टेडियमवर त्याची कामगिरी सुरेख झाली आहे.

चिन्नास्वामीवर सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही तिसरी सेंच्युरी ठोकली.

close