अनधिकृत बांधकामे पाडलेल्यांच्या पुनर्वसनाचे आदेश

October 11, 2010 11:37 AM0 commentsViews: 4

11 ऑक्टोबर

ठाणे जिल्ह्यातील कळवा साई नगरमधील अनधिकृत बांधकामे न पाडण्यासंदर्भात आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

कारवाई केलेल्या पाच कुटुंबांचे त्वरित पुनर्वसन करा, असे आदेश हायकोर्टाने दिलेत. उरलेल्या 283 याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर पुढच्या सोमवारी सुनावणी होणार आहे.

आठ कुटुंबांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांपैकी ज्यांची मुले लहान आहेत, अशा पाच कुटुंबांचे पुनवर्सन करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

या सर्व याचिकाकर्त्यांच्या घरांवर मनपाने कारवाई केली आहे.

close