सुनील राऊतला अटक

October 11, 2010 11:42 AM0 commentsViews: 4

11 ऑक्टोबर

खासदार संजय राऊत यांचा भाऊ आणि शिवसेनेतर्फे विधानसभा निवडणूक लढलेला सुनील राऊत याला पोलिसांनी अटक केली आहे.

कांजूरमार्गमधून सुनील राऊतला पोलिसांनी अटक केली.

येथील रहिवाशांना मारहाण करणे, तसेच समाज मंदिराची तोडफोड केल्याप्रकरणी त्याला अटक करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

close