कल्याण डोंबिवलीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची यादी जाहीर

October 11, 2010 12:41 PM0 commentsViews: 1

11 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची स्पर्धा यंदा मनसेसोबत आहे. शिवसेना या निवडणुकीत तिसर्‍या नंबरवर राहील, असा दावा राणेंनी यावेळी केला.

काँग्रेसच्या 37 उमेदवारांची घोषणा आज करण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 55 आणि 52फॉर्म्युल्यावर आघाडी झाली आहे.

राष्ट्रवादीची 51 नावे जाहीर

काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनही कल्याण डोंबिवलीसाठी आज उमेदवारांची यादी जाहीर केली. पहिल्या यादीत 51 जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी 52 जागा लढवणार आहे. प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी ही यादी जाहीर केली आहे.

close