काय ‘राव’ तुम्ही..!

October 11, 2010 12:53 PM0 commentsViews: 11

11 ऑक्टोबर

मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या नावापुढे राव ही बिरुदावली लावल्यानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्याची अप्रत्यक्षरित्या खिल्ली उडवली आहे.

मी स्वतःची ओळख करुन देताना विलास देशमुख म्हणूनच करुन देतो. लोक मला प्रेमाने विलासराव म्हणतात, तेही फार पूर्वीपासून अशी टिप्पणी करत विलासरावांनी मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे टार्गेट केले.

कुणाचा फोन आला किंवा कुणाला फोन केला तर माझी ओळख विलास देशमुख अशीच करुन देतो, असा टोलाही त्यांनी हाणला.

विलासराव देशमुख पंढरपूर दौर्‍यावर आले होते, त्यावेळी ते बोलत होते. विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतल्यानंतर, पत्रकारांशी बोलताना विलासरावांनी मुख्यमंत्र्यांची दांडी उडवली.

close