ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर

October 11, 2010 1:05 PM0 commentsViews: 1

11 ऑक्टोबर

बंगलोर टेस्टमध्ये सचिन तेंडुलकर आणि मुरली विजयच्या दमदार सेंच्युरीमुळे भारताने पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर दिले आहे. तिसर्‍या दिवसअखेर भारताने पाच विकेट गमावत 435 रन्स केले.

सचिन तेंडुलकर 191 रनवर नॉटआऊट आहे. सचिन तेंडुलकर आणि मुरली विजयची दमदार सेंच्युरी हे आजच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. दोघांनी नेटाने बॅटिंग करत तिसर्‍या विकेटसाठी तब्बल 308 रन्स जोडले. आणि भारतीय इनिंगला स्थैर्य आणले.

या दोघांविरुद्ध ऑस्ट्रेलियाने सात बॉलर वापरले. पण त्यांनी एकालाही दाद दिली नाही. सचिनने आज आपली 49वी टेस्ट सेंच्युरी ठोकली. मागच्या सहा टेस्टमधली त्याची ही चौथी सेंच्युरी आहे. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची अकरावी.

सचिनच्या साथीने मुरली विजयचा खेळही बहरला. आणि दोन सिक्स, 14 फोर मारत त्याने 139 रन केले. अखेर जॉनसनच्या बॉलिंगवर तो आऊट झाला. टेस्टमध्ये पदार्पण करणारा चेतेश्वर पुजारा आज चार रनवर आऊट झाला.

तर रैनाही मोठी इनिंग खेळू शकला नाही. भारतीय टीम आता पहिल्या इनिंगमध्ये 43 रन्सनी पिछाडीवर आहे.

close